काशीळ स्टँड जिल्हा परिषद शाळेची समृद्धी जाधव निबंध स्पर्धेत तालुक्यात प्रथम

by Team Satara Today | published on : 30 April 2026


सातारा : काशीळ स्टँड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या समृद्धी  जाधव  हिने  निबंध स्पर्धेत सातारा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. स्व.  छत्रपती  अभयसिंहराजे  भोसले  यांच्या  जयंतीनिमित्त सातारा पंचायत  समितीच्या  शिक्षण  विभागाने  ही  स्पर्धा  घेतली. "असा हा  सातारा" या विषयावर तिने सुंदर निबंध  सादर केला.

मार्गदर्शक शिक्षक सौ अंजली सुनील खंडाईत, गट शिक्षणाधिकारी सौ.जयश्री शिंगाडे, विस्तार अधिकारी सौ. सुजाता  जाधव, केंद्रप्रमुख सौ. सुनिता शेडगे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री. वसंत माने, मुख्याध्यापक  सौ. वैशाली क्षीरसागर तसेच सर्व शिक्षक आणि  ग्रामस्थ यांनी तिचे अभिनंदन केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोडोली येथे ट्रान्सफॉर्मरमधील साहित्य चोरी; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
पुढील बातमी
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव प्राचार्या सौ. शुभांगी मुरलीधर गावडे यांचे निधन

संबंधित बातम्या