मसूरमध्ये एकाकडून गावठी पिस्टल जप्त

सातारा स्थानिक गुन्हे शाखेसह मसूर पोलीस यांची धडाकेबाज कारवाई

by Team Satara Today | published on : 17 December 2024


सातारा : मसूर, ता. कराड येथे अवैधरित्या गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि मसूर पोलिसांनी संयुक्तरीत्या पार पाडली आहे.

संदेश सतिश ताटे वय १९ रा. ओगलेवाडी, ता. कराड जि. सातारा असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अंतवडी, ता. कराड गावच्या हद्दीत मसूर ते शामगाव जाणाऱ्या रस्त्यावर एक जण मोटरसायकल वरून मिस्टर घेऊन येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना बातमीदारमार्फत मिळाली होती त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या अधिपत्याखाली असलेल्या पथकास सूचना देऊन संबंधित परिसरात कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या.

दिनांक 16 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील आणि त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या पथकाने अंतवडी, ता. कराड गावच्या हद्दीत मसूर-शामगाव रस्त्यावर मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचला. बातमी वरील वर्णनाप्रमाणे एक जण मोटरसायकल वरून येताना पथकास दिसला. त्याला जागीच पकडून त्यास ताब्यात घेतले असता त्याच्या कब्जात एक देशी बनावटीचे पिस्टल, एक जिवंत काडतूस आणि एक मोटर सायकल असा एक लाख 25 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल मिळाला. या युवका विरुद्ध मसूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा पोलीस दलाकडून नोव्हेंबर 2022 पासून ते आजपर्यंत 104 देशी बनावटीची पिस्टल, चार बारा बोअरच्या बंदुका, दोन रायफल, 231 जिवंत काडतुसे, 383 रिकाम्या पुंगळ्या आणि चार मॅक्झिन जप्त करण्यात आले आहेत.

या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पारितोष दातीर, सचिन साळुंखे, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, लक्ष्मण जगधने, हसन तडवी, सनी आवटे, मुनीर मुल्ला, अमित झेंडे, अजय जाधव, राजू कांबळे मनोज जाधव, धीरज महाडिक, अमृत कर्पे, वैभव सावंत, तसेच मसूर पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात, पोलीस अंमलदार महेश लावंड, अमोल पवार, महेश घुटूगडे, विक्रम पोतेकर यांनी सहभाग घेतला.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत कराड दक्षिण काँग्रेसचा संवाद मेळावा
पुढील बातमी
लाच प्रकरणातील दोनही संशयितांना पाच दिवसांची पोलीस कोठडी

संबंधित बातम्या