श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती उत्साहात साजरी

by Team Satara Today | published on : 17 March 2025


सातारा : श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांचा इतिहास दैदीप्यमान असा आहे. मुरूम येथील त्यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिली. 

जिल्हा परिषद सातारा व ग्रामपंचायत मुरूम यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची 332 वी जयंती मुरूम तालुका फलटण येथे साजरी करण्यात आली. यावेळी विधान परिषदेचे सभापती शिंदे बोलत होते. याप्रसंगी ग्रामविकास व   पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन पाटील, आमदार उत्तमराव जानकर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार रामहरी रूपवनकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद आदी उपस्थित होते.

श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी 30 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार लवकरच कामाला सुरुवात होईल, असे सांगून विधान परिषदेचे सभापती शिंदे म्हणाले, मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळाबरोबर येथे मल्हारसृष्टी उभारण्यासाठी ही प्रयत्न केला जाईल. यासाठी जमीन कमी पडत असल्यास तीही उपलब्ध करून देणे विषयी सांगण्यात येईल. हे जन्मस्थळ युवा पिढीसाठी ऊर्जा व प्रेरणास्त्रोत ठरेल अशा पद्धतीने काम केले जाईल.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पाण्याची वाफ होईपर्यंत उकाडा वाढणार
पुढील बातमी
डोंगरी महोत्सवाच्या भव्य आयोजनासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे : पालकमंत्री शंभूराज देसाई

संबंधित बातम्या