मोबाईल वर PM Kisan list.APK किंवा PM Kisan.APK या msg ची लिंक उघडू नये

कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

by Team Satara Today | published on : 07 March 2025


सातारा:   प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पी.एम. किसान योजना) अंतर्गत शेतकऱ्यांच्या मोबाईल वर PM Kisan list. APK किंवा PM Kisan. APK या msg ची लिंक उघडताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात असलेली रक्कम गायब होत आहे. 

तरी शेतकऱ्यांनी मोबाईल वर PM Kisan list.APK किंवा PM Kisan.APK या msg ची लिंक उघडू नये. किवा सदर लिंकचा वापर शेतकऱ्यांनी करू नये. तसेच अशी काही घटना घडल्यास किंवा आढळून आल्यास त्वरित जवळच्या संबंधित सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन  जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कराडच्या कांबिरवाडीत बिबट्याचा धुमाकूळ
पुढील बातमी
सातारा तालुक्यात 709 खातेदारांच्या वारस नोंदी

संबंधित बातम्या