UCC च्या घोषणेवरून औवेसींचे अमित शाहांना आव्हान, म्हणाले – 'तुमच्यात हिंमत असेल तर गोव्यात UCC लागू करून दाखवा...'

by Team Satara Today | published on : 15 September 2026


दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी २०२९ पूर्वी भाजपच्या नेतृत्वाखालील NDAच्या सर्व २१ राज्यांमध्ये समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याची घोषणा केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. AIMIMचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी शाह यांच्या घोषणेवर प्रश्न उपस्थित करत भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अमित शाह यांच्यावर गैर-हिंदूंवर हिंदू कायदा लादण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. UCCचा वापर केवळ मुस्लिमांना लक्ष्य करण्यासाठी केला जात असल्याचा दावाही औवेसी यांनी केला.
औवेसी यांनी गोव्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा संदर्भ देत अमित शाह, भाजप आणि RSSला UCC लागू करण्याचे आव्हान दिले. औवेसी म्हणाले, गोव्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. मी अमित शाह, भाजप आणि RSSला आव्हान देतो. पुढे या आणि गोव्यात UCC लागू करून दाखवा.
तसेच, गोव्यात उभे राहून उत्तराखंड, गुजरात आणि आसाममध्ये लागू करण्यात आलेल्या कायद्याप्रमाणेच UCC गोव्यातही लागू करणार असल्याची घोषणा करा, असे आव्हान त्यांनी दिले. तुम्ही खरोखरच गोव्यात UCC लागू करणार आहात का? करून दाखवा, पण तुम्ही तसे करणार नाही, असा दावा औवेसी यांनी केला.
UCC समानतेसाठी आणला जात नाही
औवेसी यांनी भाजपच्या UCCच्या भूमिकेवर टीका करताना म्हटले की, भाजप समानतेच्या उद्देशाने समान नागरी कायदा आणत नाही. त्यांच्या मते, भाजपने आपल्या राज्यांमध्ये आणि सरकारी पातळीवर UCC लागू करण्यामागे देशातील सुमारे १८ कोटी मुस्लिमांना लक्ष्य करण्याचा उद्देश आहे. UCCच्या माध्यमातून संविधानातील अनुच्छेद २५ (धार्मिक स्वातंत्र्य), अनुच्छेद १४ (समानतेचा अधिकार), अनुच्छेद २६ आणि अनुच्छेद २९ यांचे उल्लंघन होत असल्याचा आरोपही औवेसी यांनी केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
NEET-UG परीक्षा आता कम्प्युटर-बेस्ड स्वरूपात घेण्याची तयारी सुरू; NTA प्रमुख अभिषेक सिंग यांची माहिती, परीक्षेचे आधुनिकीकरण आणि कडक सुरक्षा यांचा मेळ घालणार
पुढील बातमी
राज्यातील १८ जिल्ह्यांतील दुष्काळी परिस्थिती; आकडेवारी मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

संबंधित बातम्या