सातारा : विलासपूर येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 5 रोजी दुपारी दीड ते पावणेचार वाजण्याच्या दरम्यान इजाज मुख्तार शेख यांच्याकडे भाडेकरू असलेल्या सोनम वैभव पवार रा. गणेश नगर, विलासपुर, सातारा यांच्या बंद दरवाज्याचे कुलूप अज्ञात चोरट्याने तोडून घरातील 66 हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार पोळ करीत आहेत.