स्वतंत्र भारद्वाजला मोठा झटका; पॉक्सोसह अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल; कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी

by Team Satara Today | published on : 05 September 2026


दिल्ली : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर स्वतंत्र भारद्वाज याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. कोर्टाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सीजेपीच्या आंदोलनादरम्यान एका अल्पवयीन कार्यकर्त्याच्या वडिलांवर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी उत्तर प्रदेशात त्याला ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही अटक झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वतंत्र भारद्वाज यांना शनिवारी करखरुमा न्यायालय संकुलातील संबंधित न्यायाधीशांच्या निवासस्थानी हजर करण्यात आले. दरम्यान, त्यांचे समर्थक निषेध करण्यासाठी पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात जमल्याने बाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. महत्त्वाच्या ठिकाणी बॅरिकेड्स उभारण्यात आले होते आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले होते.
पॉक्सो कायद्यांतर्गत नवीन एफआयआर
अल्पवयीन कार्यकर्त्याच्या तक्रारीच्या आधारे भारद्वाज याच्या विरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत एक नवीन एफआयआर देखील दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीत ऑनलाइन धमक्या आणि छळाचे आरोप आहेत. या प्रकरणात भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत.
नेमके प्रकरण काय?
शुक्रवारी, दिल्ली पोलिसांनी कथित हल्ल्याशी संबंधित एफआयआरमध्ये अनुसूचित जाती/जमाती कायदा आणि गुन्हेगारी धमकीच्या तरतुदींचा समावेश केला. २० जुलैच्या आंदोलनादरम्यान अल्पवयीन कार्यकर्त्याच्या वडिलांच्या डोक्याला दुखापत केल्याचा दावा भारद्वाज यांनी एका मुलाखतीत केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. दुखापत दर्शवणारे वेगवेगळे व्हिडीओ प्रसारित होत आहेत. नंतर, एका पॉडकास्टमध्ये त्यांनी आत्मसंरक्षणाचा दावा केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आहीर-तापोळा केबल स्टे ब्रिज गणेशोत्सवाच्या काळात छोट्या वाहनांसाठी खुला होणार; चाळीस किलोमीटरचे अंतर वाचणार
पुढील बातमी
अलमट्टी, केआरएस, तुंगभद्रासह राज्यातील अनेक जलाशयांच्या संकेतस्थळांवर सायबर हल्ला; माहिती चोरल्याची चिंताजनक बाब समोर

संबंधित बातम्या