साडेपाच लाख रुपये किंमतीचा सोन्याच्या चुऱ्याचा अपहार केल्याप्रकरणी कामगारावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 05 May 2026


सातारा : सोन्याच्या चुऱ्याचा अपहार केल्याप्रकरणी कामगाराविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 4 मार्च रोजी साहिल नामदेव गिड्डे (रा. भवानी पेठ, सातारा) यांच्या कंपनीतील कामगार राहुल राजाराम हेम्बराम (मूळ रा. हुगली, पश्चिम बंगाल सध्या रा. सदाशिव पेठ, सातारा) याने त्याला बनवण्यास दिलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा साडेपाच लाख रुपये किंमतीचा सोन्याचा चुरा घेऊन पलायन केले आहे. याबाबतची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक साबळे करीत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पाडळी येथे अवैधरित्या दारू विक्रीप्रकरणी एकावर कारवाई
पुढील बातमी
साताऱ्यात पनीर म्हणून चीज ॲनालॉग विक्री केल्यास कठोर कारवाई; अन्न व औषध प्रशासन विभागाचे निर्देश

संबंधित बातम्या