सातारा : कोणार्क सोसायटी,दिव्यनगरी येथे बंद असलेल्या बंगल्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने प्रवेश करत कपाटातील ७३ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार रामचंद्र सखाराम संकपाळ(वय ६३, रा. दिव्यनगरी, सातारा) हे बाहेरगावी असल्याने त्यांच्या बंद बंगल्याचे कुलूप हत्याराने तोडून चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला. बंद कपाटातील दोन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी, चार वाट्या, वीस तोळे वजनाच्या चांदीच्या वस्तू आणि आठ हजार रुपयाची रोख रक्कम चोरून नेली आहे.