01:21pm | Nov 28, 2024 |
मुंबई : नुकताच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. या यशानंतर, महाराष्ट्राचा आगमी मुख्यमंत्री कोण याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आशात विधानसभेचा कालावधी संपल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. नुकतीच त्यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. एकनाथ शिंदे यांनी युती धर्म पाळण्याची घोषणा करत मुख्यमंत्री पदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. मात्र, त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. अशात श्रीकांत शिंदे यांची वडील एकनाथ शिंदे यांच्याबद्दलची एक्सवरील एक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होत आहे. श्रीकांत शिंदे यांची ही भावनिक पोस्ट असून यात त्यांनी बाबा.. मला तुमचा अभिमान वाटतो असे लिहिले आहे.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मोठे यश मिळविले आहे. या निवडणुकीत 288 पैकी 236 जागांवर महायुतीने विजय संपादन केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे कायम राहतील अशी चर्चा होती. शिंदे यांचीही पुन्हा मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. मात्र, या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याने त्यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रधानमंत्री मोदी आणि गृहमंत्री यांच्यात चर्चा झाली आहे. त्यांनी मोदी-शहा मुख्यमंत्रिपदाबाबत जो निर्णय घेतील, तो मला मान्य असल्याचे स्पष्ट केलं आहे. अशात शिंदे यांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदेंनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली आहे.
एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर, त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी एक्सवर पोस्ट लिहिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की,
मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्यनेते एकनाथजी शिंदे साहेब यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे. त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले. समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम, विश्वास आणि प्रशंसा मिळवली. ते स्वतःला 'सीएम' म्हणजे 'कॉमन मॅन' समजत. त्यांनी सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचे दार उघडले आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला.
कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही त्यांची नम्रता आणि कर्तव्यभावना दिसून येते. आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर विश्वास ठेवून, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचे पालन करत एक प्रगल्भ उदाहरण ठेवले आहे.
सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व गाजवते. भल्याभल्यांना मोहात पाडते, पण शिंदे साहेब अपवाद ठरले. त्यांच्यासाठी जनसेवा आणि राष्ट्रनिर्मिती हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. गोर - गरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती आहे.
खूप अभिमान वाटतो बाबा!
मकरंद पाटील यांचे साताऱ्यात जल्लोषी स्वागत |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
फोन उचलत नसल्याच्या कारणातून एकास मारहाण |
कार-दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू |
मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी |
पोलीस भरती प्रक्रियेमध्ये बोगस प्रकल्पग्रस्तांचे दाखले देऊन फसवणूक करणारा जेरबंद |
...अखेर जखमी रमेश जगदाळे यांचे निधन |
ख्रिस्ती समाजाचे प्रश्न तातडीने सोडवणार : ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले |
ना.जयकुमार गोरेंच्या मंत्रीपदाने युवा नेते शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानची सातारा शहरात एन्ट्री |
सत्ताधाऱ्यांनी अन्याय केला तर आंदोलनाने आवाज उठवू |
जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवा |
रचना प्रॉपर्टी एक्स्पो 2024 : बिल्डर्स असोसिएशन सातारा शाखेचा अभिनव उपक्रम |
स्थानिक स्वराज्य संस्था पूर्ण ताकतीने लढूया... |
कामेरीचे जवान शुभम घाडगे यांना बलनोई येथे वीरमरण |
कॅबिनेट मंत्र्यांच्या समन्वयामुळे जिल्ह्याचा होणार विकास |
पोलीस भरती प्रक्रियेमध्ये बोगस प्रकल्पग्रस्तांचे दाखले देऊन फसवणूक करणारा जेरबंद |
...अखेर जखमी रमेश जगदाळे यांचे निधन |
ख्रिस्ती समाजाचे प्रश्न तातडीने सोडवणार : ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले |
ना.जयकुमार गोरेंच्या मंत्रीपदाने युवा नेते शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानची सातारा शहरात एन्ट्री |
सत्ताधाऱ्यांनी अन्याय केला तर आंदोलनाने आवाज उठवू |
जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवा |
रचना प्रॉपर्टी एक्स्पो 2024 : बिल्डर्स असोसिएशन सातारा शाखेचा अभिनव उपक्रम |
स्थानिक स्वराज्य संस्था पूर्ण ताकतीने लढूया... |
कामेरीचे जवान शुभम घाडगे यांना बलनोई येथे वीरमरण |
कॅबिनेट मंत्र्यांच्या समन्वयामुळे जिल्ह्याचा होणार विकास |
दगडाने मारहाण प्रकरणी एकाविरोधात गुन्हा |
अपघात प्रकरणी कार चालकावर गुन्हा |
मंगळवार पेठेतून दुचाकीची चोरी |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
शाहूनगरमधील घरफोडीची उकल |