सातारा बसस्थानक परिसरातून दुचाकीची चोरी

by Team Satara Today | published on : 11 June 2025


सातारा : सातारा बसस्थानक परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 6 रोजी संध्याकाळी सहा ते सव्वा सहा च्या दरम्यान सातारा एसटी स्टँड येथील आउट गेटच्या पार्किंग मध्ये पार्क केलेली अभिजीत विलास घोरपडे रा. शिरढोण, ता. कोरेगाव, जि. सातारा यांची दुचाकी क्र. एमएच 11 एक्यू 4691 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पोळ करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कराडमध्ये एआय तंत्रज्ञानाद्वारे बनवला अश्‍लील व्हिडिओ
पुढील बातमी
विनाकारण मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या