श्री खंडोबा देवाची वार्षिक यात्रे निमित्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 लागू

श्री काळेश्वरी देवी मांढरदेव यात्रा कालावधीत पशुबळी व वाद्य वाजविण्यास बंदी

by Team Satara Today | published on : 01 January 2025


सातारा : पाल ता. कराड येथील श्री खंडोबा देवाची वार्षिक यात्रा 9 ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत साजरी होणार आहे. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक समीर शेख  यांना प्राप्त झालेल्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 36 प्रमाणे अधिकारास अनुसरुन पाल यात्रेतील मानकारी यांचे मानाचे बैलगाडीबाबतीत अटी व शर्थी संबंधीचे आदेश दि. 11 जानेवारी रोजीच्या सकाळी 8 पासून ते 12 जानेवारी सकाळी 6 पर्यंत जारी केले आहेत.

यात्रेत सामिल होणा-या बैलगाडीवान यांनी गाडी ओढणा-या बैलांना वेसन घातलेली असावी. तसेच नेहमी जुंपण्यात येणा-या व माणसाळलेल्या बैलांचाच वापर करावा. प्रत्येक गाडीत ५ पेक्षा जास्त लोकांनी बसू नये मिरवणुकीच्यावेळी दोन्ही बैलगाडयामध्ये सुरक्षित अंतर असावे. प्रत्येक गाडीमालकाने आपल्या गाडीपासून इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.

दि. ११ जानेवारी २०२५ रोजी मुख्य मिरवणुकी करीता ८ वाजता सर्व मानकरी यांनी आपल्या बैलगाडया/ट्रैक्टर/जिप घेवून  श्री बाबासाहेब इंजोजीराव पाटील पाल ता. कराड यांच्या वाडयासमोर जमावे व आपले मानाप्रमाणे उभे रहावे. मुख्य मिरवणुकीतील वाहनांची व जनावरांची तपासणी संबधित तज्ञांकडून करवून घ्यावी व ते मिरवणुकीस वापरणेस योग्य आहेत याबाबतचे प्रमाणपत्र घ्यावे.

दि. 11 जानेवारी रोजी सायंकाळी श्री खंडोबा देवाचा लग्न सोहळा संपन्न झालेनंतर सर्व मानकरी आपआपल्या बैलगाड्या/ट्रॅक्टर/जिप घेवून त्यांचे मुक्कामांचे ठिकाणी घेवून जातील. दि.१२ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजता रितीरिवाजाप्रमाणे मानकरी आपल्या बैलगाडया/ट्रॅक्टर/जिप बोहल्याच्या ठिकाणी मानाप्रमाणे उभ्या करतील. तेथून देवाची मुर्ती पालखीतून मंदिरात जाणेसाठी मिरवणुकीने निघताच सर्व मानक-यांनी आपल्या बैलगाडया/ट्रॅक्टर/जिप मिरवणुकीचे मार्गाने खंडोबा देवाच्या मंदिरात ६ वाजता आणाव्यात. देवाची मुर्ती मंदिराचे गाभा-यात ठेवल्यानंतर सर्वानी आप आपल्या गाड्या घेवून जाव्यात. 

ज्या मानक-यांची वरील प्रमाणे वागण्याची इच्छा नाही त्यांनी आपल्या बैलगाडया/ट्रेक्टर/जिप मिरवणुकीमध्ये आणू नयेत.  मिरवणुकीतील मानकरी बैलगाडया/ट्रॅक्टर/जिप यांचे चालक यांना वरील नियमाप्रमाणे वागण्याचे बंधन राहिल. वरील नियमांचे उल्लघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३४ अन्वये कारवाई पात्र राहतील.

 तसेच 11 जानेवारी हा यात्रेचा मुख्य दिवस असून मिरवणुकीसंबंधी मानकरी यांना वागण्याबाबत खालील नियम करण्यात आलेले आहेत.

यात्रेच्या मुख्य दिवशीच्या मिरवणुकीमध्ये सामिल होणा-या मानाचा घोडा यास लगाम घातलेला असावा. तसेच मिरवणुकीमध्ये माणसाळलेला, शिकाबू घोडयाचाच वापर करावा. इतर भाविकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.

दि.११ जानेवारी रोजी मुख्य मिरवणुकी करीता ८ वाजता मानकरी बाबासाहेब इंजोजीराव पाटील रा. पाल ता. कराड यांचे वाडयासमोर जमावे व आपले मानाप्रमाणे उभे रहावे. दुपारी 2 वा. बैलगाडीतुन देव देवळातून मंडपातून मंडपाबाहेर आणलेनंतर तेथुन देवाची मिरवणुक मानकरी श्री. देवराज  पाटील रा. पाल ता. कराड यांचे समवेत मिरवणुकीने निघावे. सदरवेळी मानाचा घोडा व चोपदार यांनी मिरवणुकीचे पुढे रहावे. सायंकाळी सायं.6 वा. देवाचे लग्नाचा सोहळा संपन्न झालेनंतर मानकरी आपला घोडा आपले मुक्कामाचे ठिकाणी घेवून जातील.

मुख्य मिरवणुकीतील घोडयाची तपासणी संबधित पशु वैद्यकीय अधिकारी यांचेकडून करवून घ्यावी व ते मिरवणुकीस वापरणेस योग्य आहेत याबाबतचे प्रमाणपत्र घ्यावे.

मानकरी यांना वरील प्रमाणे अटी व शर्ती मान्य नसतील तर त्यांनी आपले घोडे मिरवणुकीमध्ये आणु नये.

मिरवणुकीतील मानकरी यांचे घोडयाचे चालक यांना वरील अटी व शर्तीप्रमाणे वागण्याचे बंधन राहिल. वरील नियमांचे उल्लघन केल्यास मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३४ अन्वये कारवाईस पात्र रहातील याची सर्व संबधितांनी नोंद घ्यावी.

पाल ता. कराड येथे  श्री खंडोबा देवाची वार्षिक यात्रा दि.9  ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत साजरी होणार आहे. यात्रा कालावधीत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी मुंबई पोलीस अधनियम 1951 चे कलम 36 नुसार असलेल्या अधिकाराचा वापर करुन कायदा व सुव्यवस्थेच्या बंदोबस्त कामी नेमलेल्या सर्व संबंधित पोलीस अधिकारी व त्यांच्याहून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना 9 ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत  पोलीस ठाणे हद्दीतील जनतेचे स्वास्थ, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणून वाहनांच्या नियमासंदर्भात व यात्रेच्या अनुषंगाने    व्यक्तींचे  वर्तन  असावे, ध्वनी प्रदुषणानच्या अनुषंगाने मा. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्बंधाचे यथोचित पालन व्हावे या दृष्टीने आवश्यक असणारे सर्व निर्देश देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

मांढरदेव ता. वाई येथे श्री काळुबाई मांढरदेवी यात्रा दि.12  ते 29 जानेवारी 2025 या कालावधीत साजरी होणार आहे. यात्रा कालावधीत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी मुंबई पोलीस अधनियम 1951   चे कलम 36 नुसार असलेल्या अधिकाराचा वापर करुन कायदा व सुव्यवस्थेच्या बंदोबस्त कामी नेमलेल्या सर्व संबंधित पोलीस अधिकारी व त्यांच्याहून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना 12 ते 29 जानेवारी 2025 या कालावधीत  पोलीस ठाणे हद्दीतील जनतेचे स्वास्थ, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणून वाहनांच्या नियमासंदर्भात व यात्रेच्या अनुषंगाने    व्यक्तींचे  वर्तन  कसे असावे, ध्वनी प्रदुषणाच्या अनुषंगाने मा. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्बंधाचे यथोचित पालन व्हावे या दृष्टीने आवश्यक असणारे सर्व निर्देश देण्याचे अधिकार प्रदान केले आहेत

श्री काळेश्वरी देवी मांढरदेव यात्रा कालावधीत पशुबळी व वाद्य वाजविण्यास बंदी

मांढरदेव ता. वाई या ठिकाणी दि.12  ते 29 जानेवारी या कालावधीत श्री काळेश्वरी देवीची वार्षिक यात्रा संपन्न होणार आहे. या कालावधीत पशुबळी देण्यास व वाद्य वाजविण्यास बंदी आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दुचाकी वाहनासाठी एमएच-11 डीटी मालिका सुरु
पुढील बातमी
नटराज मंदिराचा रथोत्सव सोहळा

संबंधित बातम्या