प्रतापसिंह नगरातील दोन जुगार अड्ड्यांवर छापे

सातारा : सातारा शहर पोलिसांनी प्रतापसिंह नगरातील दोन जुगार अड्ड्यांवर छापे मारून दोन जणांवर कारवाई केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक एक रोजी सातारा शहरातील प्रतापसिंह नगर येथील प्राजक्ता जनरल स्टोअर्स च्या समोर असणाऱ्या पत्र्याच्या आडोशाला जुगार घेताना तेथीलच जीवन महादेव गायकवाड आढळून आला. त्याच्याकडून 710 रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.

दुसऱ्या घटनेत गवारे गल्ली लिंबाच्या झाडाखाली असलेल्या पत्र्याच्या शेडच्या आडोशाला प्रदीप राजेंद्र साळवे रा. प्रतापसिंह नगर, सातारा हा जुगार घेताना आढळून आला. त्याच्याकडून 650 रुपये रोख व दुकानाचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.


मागील बातमी
वृद्धेस मारहाण केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा
पुढील बातमी
सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांच्या उपस्थितीत जावली येथे घेतला जाणार विविध योजनांचा आढावा

संबंधित बातम्या