सातारा : सेवानिवृत्त शिक्षकाची सुमारे साडेसहा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी शरद सदाशिव धेंडे (रा. गोडोली, सातारा) यांना दि. एक सप्टेंबर ते पाच नोव्हेंबर दरम्यान सौरभ द्विवेदी आणि एका महिलेने (दोघेही रा. हैदराबाद) फोनवरून आम्ही आयआरडीए ऑफिस मधून बोलत असल्याचे सांगून धेंडे यांच्याकडून वेगवेगळी कारणे सांगून 6 लाख 52 हजार 711 रुपये घेऊन फसवणूक केली आहे. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटोळे करीत आहेत.
सेवानिवृत्त शिक्षकाची सुमारे साडेसहा लाखांची फसवणूक; दोन हैदराबादच्या जणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 28 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा