04:41pm | Dec 09, 2024 |
नवी दिल्ली : भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळात अडकली आहे. जून महिन्यापासून ती इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर आहे. अंतराळाशी संबंधित विविध प्रयोग करण्यासाठी ती अंतराळात गेली होती. पण यानात काही बिघाड झाल्याने ती तिथेच अडकली. सुनीताने अलीकडेच काही विद्यार्थ्यांशी ती अंतराळात पाणी कसे पितात हे सांगितले. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकं त्यावर आश्चर्य व्यक्त करत आहेत. सुनीता विल्यम्सने तिचे मूळ गाव नीडहॅम, मॅसॅच्युसेट्स येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ते करुन दाखवलं आहे.
एका विद्यार्थ्याने सुनीता यांना त्या अंतराळात पाणी कसे पितात याबाबत विचारले होते. त्यानंतर सुनीताने पाण्याचे पाकीट काढले. त्यातून पाण्याचे काही बुडबुडे बाहेर आले. अवकाशयानात ते बुडबुड उडत असताना सुनीताने हे प्यायले. सुनीता हिने तिचा साथीजार विल्मोर बुच सोबत अंतराळात सहा महिने पूर्ण केले आहेत. हे दोघेही जूनच्या पहिल्या आठवड्यात स्टारलाइनर यानाद्वारे अंतराळात गेले होते. पण तांत्रिक अडचणींमुळे दोघांनाही आता पुढच्या वर्षी फेब्रुवारीपर्यंत तिथेच राहावे लागणार आहे.
सुनीता अंतराळात स्पेस स्टेशनमध्ये विविध प्रकारची कामे करत आहे. अलीकडेच सुनीताने अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात लेट्यूस पिकवले आहे. याद्वारे मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये वेगवेगळ्या पाण्यात भाज्या कशा वाढतात हे जाणून घेण्याचा तिने प्रयत्न केला.सुनीताच्या एका फोटोवरुन जगभरात खळबळ उडाली होती. या फोटोवरुन प्रकृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. एका फोटोत सुनीता खूपच अशक्त दिसत होती. नासापासून जगभरातील शास्त्रज्ञांना हे पाहून आश्चर्य वाटले. मात्र, सुनीताने नंतर स्पष्ट केले की, अंतराळात जाताना तिचे वजन जेवढे होते तेवढेच आहे आणि ती पूर्णपणे निरोगी आहे.सातारा बसस्थानक परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहराजवळ जमिनीच्या वादातून फायरिंग |
मराठी विश्वकोशाचे ट्विटरवर दुसरे साहित्य संमेलन |
पालकमंत्री पदाचे खरे हक्कदार ना. शिवेंद्रराजेच : श्रीरंग काटेकर |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |
एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा मृत्यू |
विडणी खून प्रकरणातील तिसऱ्या दिवशी शेतात हातासह हत्यारे सापडल्याची माहिती |