12:36pm | Sep 28, 2024 |
सासवड : राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे आणि तो आमचा हक्क आहे. यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत तब्बल सहा वेळा आमरण उपोषण करून शासनाचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र आरक्षण देण्याऐवजी आंदोलन मोडीत कसे काढायचे यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. देशाचे गृहमंत्री इतर आंदोलनाप्रमाणेच मराठा आंदोलन चिरडून टाकण्याची भाषा करीत आहेत. त्यामळे हा महाराष्ट्र आहे. गुजरात नाही, हे गृहमंत्र्यांनी लक्षात घ्यावे, असा इशारा गृहमंत्री अमित शहा यांना देतानाच छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला कसे लढायचे आहे ते शिकविले आहे. आरक्षण कसे मिळवायचे ते आम्हाला चांगले माहिती आहे. अशा शब्दात आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार व्यक्त केला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे यांनी नुकतेच सहाव्यांदा आंदोलन केले. मात्र राज्य शासनाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे जरांगे यांना पाठींबा देण्यासाठी आणि राज्य शासनाचा निषेध करण्यासाठी पुरंदर तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुरंदर बंदची हाक देण्यात आली होती. सासवड येथील शिवतीर्थ वरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करून शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
राज्यात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभे केले आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर समाजाला आरक्षण द्यावे अशी त्यांची मागणी आहे. सगेसोयरेची अंमलबजावणी करण्याची प्रमुख मागणी ते करत आहेत. दरम्यान आपल्या आंदोलनात जरांगे पाटील हे सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना दिसून येत आहे. दरम्यान आता त्यांच्या मागणीवर राज्यसरकार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे संतोष हगवणे, सागर जगताप, विठ्ठल मोकाशी, नंदकुमार जगताप, उमेश जगताप, बाळासाहेब भिंताडे, अनिल जगताप, संदीप जगताप, दत्तात्रय कड, स्वप्नील गायकवाड, सुजित बडदे, संतोष काकडे, मोहन जगताप, चंद्रकांत बोरकर, संदीप फडतरे, बंडूकाका जगताप यांच्यासह सासवड आणि ग्रामीण भागातील मराठा बांधव उपस्थित होते.
निवडणूक नायब तहसीलदार महादेव जाधव आणि पोलीस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी यांना यावेळी निवेदन देण्यात आले. दरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुरंदर तालुक्यात बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अत्यावश्यक सेवा वगळता व्यापारी, दुकानदार, सराफ, किराणा, कापड सलून आदी संघटनानी बंद मध्ये सहभाग घेतला होता. सासवड बाजार पेठेसह तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. तर सासवड बाजारपेठेत दुपारनंतर काही प्रमाणात व्यवहार सुरु झाले. पुरंदर तालुका मुस्लीम समाजाच्या वतीने हरून बागवान तसेच आरिफ आतार आदींनी मराठा समाजाच्या आरक्षणाला लेखी निवेदनाद्वारे पाठींबा जाहीर केला आहे.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |