सातारा : महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र व कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड समाजभूषण पुरस्कार प्रदान करून गौरवलेल्या श्री जानाई मळाई शिक्षण संस्था साताराच्या समाजभूषण दलितमित्र शिवराम माने विद्यामंदिर, श्री. छ. प्रतापसिंहमहाराज राजेभोसले हायस्कूल या शाळांमध्ये कार्यरत असणारी शाळा व्यवस्थापन कमिटी सेवाभावी वृत्तीने काम करणारी तसेच इतर शाळांमधील कमिट्यांना आदर्श व प्रेरणा देणारी कमिटी ठरली आहे, असे प्रतिपादन संस्थेचे सचिव संजीव माने यांनी केले.
भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून, शाळा व्यवस्थापन कमिटी सदस्य व पदाधिकार्यांनी माने कॉलनी सातारा, कुसवडे, चिखली ता. सातारा, जायगाव ता. कोरेगाव या संस्थेच्या शाखांमधील विद्यार्थ्यांना खाऊ भेट दिला. या खाऊचा स्वीकार संस्थेचे सचिव संजीव माने, खजिनदार दत्तात्रय काळे, संचालिका कु. मनीषा कदम यांनी केला.
विद्यमान शाळा व्यवस्थापन कमिटी अतिशय वेगळेपणाने आणि राज्यातील सर्व शाळांना मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीने खूपच सेवाभावी पद्धतीने आणि विद्यार्थी - शाळा हितास पूरक ठरेल, असे कार्य करत आहे. संस्थेच्या गत 35 वर्षातील इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात सक्रिय असणारी, सद्हेतू ठेवून कार्य करणारी शाळा आणि विद्यार्थी हिताला प्राधान्य देऊन समन्वय साधून कमिटीची असणारे सेवा कर्तव्य पार पाडणारी, ही पहिलीच कमिटी आहे.
या कमिटीच्या कार्याचे कौतुक संस्था संचालक, पालक वर्ग व ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात येत आहे.
सेवाभावी वृत्तीने कार्य करून इतरांपुढे आदर्श ठेवणारी शाळा व्यवस्थापन कमिटी : संजीव माने
by Team Satara Today | published on : 16 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा