सातारा : फत्त्यापूर येथील एका नागरिकाच्या घरासमोरील अंगणात उभी असलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा नोंदविला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पांडुरंग अंतू घाडगे (वय 50, रा. फत्त्यापूर) यांनी त्यांची हिरो स्प्लेंडर प्लस (एमएच 11 बीटी 1338) ही मोटारसायकल घरासमोर हँडल लॉक करून उभी केली होती. 11 जूनच्या रात्री ते 12 जूनच्या सकाळी दरम्यान अज्ञात चोरट्याने सुमारे 20 हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. या घटनेची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून महिला पोलीस कॉन्स्टेबल निंबाळकर तपास करीत आहेत.