शिवथर येथे शेतजमिनीच्या वादातून महिलेला शिवीगाळ केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 20 May 2026


सातारा : शिवथर येथे शेतजमिनीच्या कारणावरून झालेल्या वादात एका महिलेला शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवथर येथील गट क्रमांक १२२२/२ व १२२३ मध्ये ही घटना घडली. तक्रारदार व विरोधक यांची शेतजमीन लागून असल्याने वाद निर्माण झाला. या वादातून विरोधकाने तक्रारदार रूपाली अनिल पोळ (वय ४२, रा. आसगाव, ता.  सातारा) यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी शाहिद शहाबुद्दीन इनामदार (रा. शिवथर, ता. जि. सातारा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार गोरे करत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
हद्दपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी शाहूपुरीत दोघांना अटक; पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
पुढील बातमी
पैशांच्या वादातून धमकी देणाऱ्या वाढे येथील तिघांविरुद्ध गुन्हा

संबंधित बातम्या