खंडाळा : पोलीस असल्याचे सांगून वृद्धेची फसवणूक केल्याप्रकरणी दोन भामट्यांविरोधात खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खंडाळा येथे राया हॉटेलच्या पाठीमागे 75 वर्षीय वृद्धेला आधार देण्याचा बहाणा करत पोलीस असल्याचे सांगून दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी पाच तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या घेऊन पोबारा केला. दि. 22 रोजी सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. पद्मिनी रामकृष्ण लोखंडे (वय 75, रा. खंडाळा) यांनी फिर्याद दिली. खंडाळा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
पोलीस असल्याचे सांगून वृद्धेची फसवणूक
by Team Satara Today | published on : 30 October 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
जिल्हा रुग्णालयात तिरळेपणा निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे शुक्रवारी आयोजन
December 16, 2025
झाडाणी प्रकरणाची सुनावणी पूर्ण - सुशांत मोरे; अहवाल शासनाकडे पाठवणार
December 15, 2025
दिल्ली येथे महाराष्ट्रीयन खाद्य महोत्सवामध्ये सातारच्या गटांची मोहोर
December 15, 2025
मागासवर्गीय समाजातील अतुल भिसे आत्महत्याप्रकरणी सातार्यात मोर्चा
December 15, 2025