08:06pm | Oct 01, 2024 |
सातारा : सातारा शहरातील फळभाजी व्यापारी सामाजिक कार्यकर्ते व संजीवन बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र कांबळे यांनी निराधारांच्या पुनर्वसनाचा संकल्प सोडला असून या कामासाठी समाजातून मोठा निधी उभा राहावा यासाठी ते प्रयत्नरत आहेत. या योजनेची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. दिवसाचा एक रुपया म्हणून सेवाभावी वृत्तीने या प्रकल्पासाठी मदत करा, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
रामाचा गोट सातारा येथील संजीवन बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था ही वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र कांबळे यांनी सातारा जिल्हा रुग्णालयात अन्नदान योजना, गरजू मुलांना कपडे वाटप, रुग्णालयातील रुग्णांना मोफत फळे वाटप, खाजगी रुग्णालयातील दरपत्रक यांचा यशस्वी लढा, निराधार मुलांना दत्तक घेणे, त्यांच्या शिक्षणासाठी सहकार्य करणे, अनाथ मुलींचा विवाह सोहळा, गरजू मुलांना साहित्य कपडे खाऊ वाटप, बेवारस वयोवृत्त निराधार लोकांना आधार देणे, अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून सातार्याच्या सामाजिक क्षेत्रात आपली ओळख मिळवली आहे. आता सातार्यातील निराधार निराश्रीत मुलांना पुनर्वसनाच्या दिशेने येण्याकरिता संजीवन संस्थेने मदतीचा हात पुढे केला आहे.
मात्र ही मदत लोकसहभागातून होणार असून समस्त सातारकरांनी या उपक्रमासाठी सढळ हाताने मदत करावी. तुमच्या कष्टाचा एक रुपया आणि आमचे प्रामाणिक प्रयत्न अशा माध्यमातून समाजासाठी बांधिलकीच्या नात्याने निराश्रीतांची पुनर्वसन प्रक्रिया वेगाने राबवता येईल, असा विश्वास रवींद्र कांबळे यांनी यावेळी व्यक्त केला. या नवीन उपक्रमासाठी लोकप्रतिनिधींना भेटून आपल्या कल्पना सविस्तर सांगणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांनीही जपली सामाजिक बांधिलकी
आज सातार्यातील पत्रकारांनी पत्रकार परिषदेत आदर्श घडवत इतिहास बदलला. कांबळे यांचे सामाजिक कार्य पाहून पत्रकार अरुण जावळे यांनी पत्रकार परिषदेतच मदत देवू केली. यानंतर बहुतांश पत्रकारांनी सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत आपापल्या परीने मदत करत रवींद्र कांबळे यांच्या सामाजिक उपक्रमास हातभार लावला.
प्रतीक भद्रे 365
अरुण जावळे 100
ओमकार सोनवणे 365
तबरेज बागवान 365
संतोष शिराळे 501
विशाल कदम 365
प्रशांत जगताप 365
महेश चव्हाण 100
सागर गुजर 100
प्रशांत बाजी 365
अमोल निकम 365
अजित जगताप 365
पद्माकर सोळवंडे 365
दीपक कांबळे 500
अशा एकूण - 3756 रुपयांची संजीवनी सामाजिक सेवाभावी संस्थेला पत्रकारांकडून मदत झाली.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |