सातारा : मंगळवार पेठेतून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवार पेठेतून अज्ञात चोरट्याने एमएच 11 सीएस 5009 या क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली. ही घटना दि. 20 डिसेंबर रोजी घडली असून याप्रकरणी सतीश केशव पवार (वय 25, रा. मंगळवार पेठ, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.