कॅनडा : कॅनडा सरकारचा खोटेपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येशी संबंधित प्रकरणामुळे कॅनडात पेच निर्माण झाला आहे. ट्रूडो सरकारने कबूल केले आहे की त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांशी संबंधित कोणतेही पुरावे नाहीत. ट्रूडो सरकारने असेही म्हटले आहे की त्यांच्याकडे अद्याप याबद्दल कोणतीही माहिती नाही.
ग्लोब अँड मेल या वृत्तपत्राने खलिस्तानी नेता हरदीप सिंग निज्जरच्या हत्येचा आरोप भारतावर केला होता. हरदीपसिंग निज्जर हा खलिस्तानी समर्थक होता आणि त्याच्यावर भारतातील दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा आरोप होता. जून 2023 मध्ये ब्रिटीश कोलंबिया, कॅनडात त्याची हत्या झाली होती. या प्रकरणावर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी निज्जरच्या हत्येत भारतीय यंत्रणांचा हात असल्याचा आरोप केला होता. या विधानामुळे भारत-कॅनडा संबंधात तणाव वाढलाय.
कॅनडाने केलेले आरोप भारताने पूर्णपणे फेटाळून लावले होते. कॅनडा आपल्या देशातील खलिस्तानी कारवायांना आळा घालण्यात अपयशी ठरल्याचे भारताने म्हटले होते. ग्लोब अँड मेलच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, कॅनडाकडे भारतीय अधिकाऱ्यांचा गुन्हेगारी कारवायांशी संबंध असल्याचे पुरावे आहेत. वृत्तपत्राने कोणत्याही पुराव्याशिवाय भारतीय पंतप्रधानांसह अनेक बड्या लोकांवर आरोप केले. आता या अहवालानंतर कॅनडाच्या सरकारने स्पष्ट केले आहे की त्यांच्याकडे या प्रकरणात भारतीय अधिकाऱ्यांना थेट दोषी ठरवणारा कोणताही पुरावा नाही.
ट्रुडो यांच्या भारताविरोधातील वक्तव्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. भारताने कॅनडासोबतची व्यापार चर्चा स्थगित केली आणि राजनैतिक हालचाली कमी केल्या. दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या व्यापार करारांवरही याचा परिणाम झाला.
दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू |
न्या. निकम यांचा अंतरीम जामीन फेटाळला; तात्पुरत्या जामिनावर उद्या सुनावणी |
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सातारा यांना त्वरित निलंबित करण्यात यावे |
साक्षी कादबाने ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय पदावर |
लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चारजणांविरोधात तक्रार |
कोळेवाडी ग्रामसभेत मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा ठराव |
सर्वांना बरोबर घेऊन मलकापूरचा विकास करणार : आ. डॉ. अतुलबाबा भोसले |