सातारा : आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोर्ट कमिशनर यांच्या आदेशान्वये सील केलेला फ्लॅट उघडून आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बाबूराव बोबडे, कांताबाई बोबडे (रा.खेड, सातारा) यांच्या विरुध्द राहूल माथाडे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही कारवाई 27 नोव्हेबर रोजी करण्यात आली आहे.