जमिनीच्या व्यवहारातून वाद चिघळला; नागठाणे येथील डॉक्टरला जीवे मारण्याची धमकी

by Team Satara Today | published on : 15 April 2026


सातारा : नागठाणे (ता. सातारा) येथील डॉ. पंकज नलवडे यांना जमिनीच्या व्यवहारातील पैशांच्या वादातून अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोडोली येथील नंदकुमार शिवाजी नलवडे याच्याविरुद्ध बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत डॉ. पंकज नलवडे यांनी फिर्याद दिली आहे. प्राप्त माहितीनुसार, नागठाणे येथील गट क्रमांक ५६८ मधील जमिनीच्या व्यवहारातील पैशांवरून दोघांमध्ये वाद सुरू होता. या वादातून आरोपी नंदकुमार नलवडे यांनी फिर्यादीस अश्लील शिवीगाळ करत “तुला नागठाण्यात उभा-आडवा चिरतो, नाहीतर मुद्दा पाडतो” अशा शब्दांत धमकी दिली.

तसेच १२ एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादीच्या घरी जाऊन त्यांच्या वडिलांनाही धमकावले व घरात जबरदस्ती घुसून डॉ. नलवडे यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार एस. के. शिंदे करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
संगमनगर ते एमआयडीसी मार्गावर डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी; डंपर चालकाविरोधात गुन्हा
पुढील बातमी
साताऱ्यात मनसेची संघटन बांधणीवर भर; संपर्क अध्यक्ष गणेश सातपुते, वरणजीत शिरोळे यांनी घेतला जिल्ह्यातील संघटनात्मक स्थितीचा आढावा

संबंधित बातम्या