राज्यात एफडीएची धडक कारवाई; गुटखा-पानमसाला प्रकरणात १० जणांना अटक, १ कोटी ७ लाख ६१ हजार ९४४ रुपये किमतीचा माल जप्त

by Team Satara Today | published on : 19 August 2026


मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर धडक कारवाई करत प्रतिबंधित पानमसाला, गुटखा आणि अन्य अन्नपदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे. १४ जुलै ते १७ ऑगस्ट या कालावधीत झालेल्या कारवाईत एकूण १ कोटी ७ लाख ६१ हजार ९४४ रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला.

प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या विक्री, वितरण आणि वाहतुकीप्रकरणी सात एफआयआर दाखल करून दहा जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच आठ अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

राज्यव्यापी विशेष तपासणी मोहिमेत दूध व दुग्धजन्य पदार्थांसह बेकरी पदार्थ, खाद्यतेल आणि अन्य अन्नपदार्थांची तपासणी करण्यात आली. दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या तपासणीत पालघरच्या चारोटी टोलनाक्यावर अस्वच्छ आणि अयोग्य तापमानात वाहतूक केला जाणारा २ लाख १२ हजार २०० रुपये किमतीचा कोलोस्ट्रमचा साठा जप्त करण्यात आला.

गुटख्यावर सर्वाधिक कारवाई

प्रतिबंधित पानमसाला, गुटखा, सुगंधित तंबाखू आदींच्या विक्री, साठवणूक आणि वाहतुकीविरोधात कोकण, पुणे, नाशिक आणि नागपूर विभागात कारवाई करण्यात आली. राज्यभरातील ६५ हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे आणि अन्य अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जम्मू आणि काश्मीर भारताचा महत्त्वाचा भाग : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची भेट घेतल्यानंतर गोर यांनी काश्‍मीरबाबत महत्त्वपूर्ण विधान
पुढील बातमी
सुखेड व बोरीचा शिव्या देण्याची अनोखी परंपरा असलेला ‘बोरीचा बार’ शिव्यांच्या भडिमारात रंगला; बोरीचा बार पाहण्यासाठी मोठी गर्दी

संबंधित बातम्या