सातारा : नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माघारप्रकरणी विकास शिंदेंवर केलेली कारवाई योग्य असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. तसेच महायुतीचा फॉर्म्युला सातारा जिल्ह्यात राबवला गेला नाही सातारा शहरात महायुती झाली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांना वाईचे उपजिल्हाप्रमुख व नगराध्यक्ष पदाचे शिंदे गटाचे उमेदवार विकास शिंदे यांनी घेतलेला माघारी संदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले, शिंदे त्यांना पक्षाला विश्वासात न घेता परस्पर अर्ज माघारी घेणे ही प्रक्रिया धोरणाशीच विसंगत आहे. त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांना विश्वासात घेतली नाही. त्यामुळे झालेली कारवाई ही योग्यच असल्याचा स्पष्ट निर्वाळा देसाई यांनी दिला. तसेच महायुतीचा फॉर्म्युला सातारा जिल्ह्यात राबवला गेला नाही सातारा शहरात महायुती झाली नाही.
यासंदर्भात बोलताना ते म्हणाले महायुतीची समन्वय बैठक मीच पालकमंत्री या नात्याने शासकीय विश्रामगृहात घेतली होती. भाजपच्या सर्व मान्यवर मंत्र्यांची वेळ घेण्याच्या संदर्भाने मी जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांना विनंती केली होती. मात्र त्यांच्याकडून मला काहीही पाठपुरावा आला नाही,. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी साताऱ्यात शिवसेना शिंदे गटाकडून कोणताही प्रतिसाद नसल्याचे पत्रकारांना सांगितले. या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले खरी परिस्थिती काय याचा खुलासा स्वतः जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांनी करावा. माझ्याकडून विचारण्यात झाली होती मात्र त्यांच्याकडूनच काही उत्तर आले नाही, असे शंभूराजे देसाई यांनी स्पष्टपणे सांगितले.