मुंबई : हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यातून आता खऱ्या अर्थानं पावसानं काढता पाय घेण्यास सुरुवात केली असून, टप्प्याटप्प्यानं विश्रांती घेत हा वरुणराजा मोठ्या रजेवर जाण्यासाठी सज्ज झाला आहे. एकिकडून पुढचे 24 तास मुसळधार पावसाचा अंदाज असतानाच दुसरीकडे मात्र वाऱ्याच्या बदललेल्या दिशेमुळं आता या प्रणालीतही महत्त्त्वाचे बदल झाल्याचं सांगत पुढील तीन दिवस तरी राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पाऊस उसंत घेईल. आठवड्याचा शेवट जरी पावसाच्या अनुपस्थितीत होणार असला तरीही सोमवारपासून विदर्भ पट्ट्यामध्ये हा पाऊस पुन्हा एकदा बरसणार असल्याचा अंदाज आहे.
दरम्यान पुढील 24 तासांसाठी कोकण, सातारा, कोल्हापूर आणि पुण्यातील घाटमाथ्यावरील भागांमध्ये मात्र पावसाच्या जोरदार सरींचा अंदाज असून, इथं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तिथं मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही घाट क्षेत्रामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
मध्य भारतात सक्रिय असणाऱ्या कमी दाब क्षेत्रानं बाष्प खेचून नेल्यामुळं राज्याच्या कैक भागांमध्ये पाऊस विश्रांती घेताना दिसेल. विश्रांतीनंतर हा वरुणराजा परतणार असला तरीही तो कमीजास्त प्रमाणातच हजेरी लावणार असल्यामुळे आता मान्सून परतच्या प्रवासासाठी सज्ज झाला आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही.
दरम्यान, मान्सून वाऱ्यांचा प्रभाव असणारा कमी दाबाचा पट्टा अमृतसरपासून बंगालच्या उपसागरात ईशान्येपर्यंत सक्रिय असून, गुजरातपासून कर्नाटकपर्यंतही कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. ज्यामुळं राज्यातील हवामानावर याचे थेट परिणाम पाहायला मिळत आहेत. राज्यात अनेक भागांमध्ये सध्या पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळं तापमानात वाढ झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशांच्या पुढे गेलं आहे, तर, किमान तापमानातही वाढ झाल्यामुळं हा उकाडा आता नागरिकांना घाम फोडताना दिसत आहे.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |