मोती चौकात अगरबत्ती आणि चप्पल व्यावसायिकांमध्ये वाद; परस्पर विरोधी तक्रारी

by Team Satara Today | published on : 24 December 2025


सातारा  : मोती चौकातील अगरबत्ती व्यावसायिक आणि चप्पल व्यावसायिक यांच्या दुकानातील साहित्यावर धूळ उडत असल्याचा कारणातून वाद निर्माण झाला. यावेळी एकमेकांच्या मालाची मोडतोड करून नुकसान केल्याप्रकरणी दोघांनी एकमेकांच्या विरोधात तक्रारी केल्या असून शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

याप्रकरणी संतोष पोपळकर (वय ५२,राहणार गडकर आळी) आणि मीनाज मुनीर इनामदार (वय ५०,रा.  कोंडवे) यांनी एकमेकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी घेतली उदयनराजे यांची भेट; सातारा शहराच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही
पुढील बातमी
सातारा शहर पोलिसांचा सिव्हिल हॉस्पिटलनजीक जुगार अड्ड्यावर छापा

संबंधित बातम्या