सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी सहाजणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रतापसिंहनगर येथे जुन्या भांडणाच्या कारणातून मारहाण केल्याप्रकरणी 6 जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संग्राम बोकेफोडे, नेताजी बोकेफोडे, विक्रम वाघमारे, अमर, रवी, अनोळखी एकजण यांच्या विरुध्द दत्तात्रय काशिनाथ अस्वरे (वय 21, रा. समर्थ मंदीर, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. संशयितांनी कोयत्याने मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी केली. ही घटना दि. 7 जानेवारी रोजी घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.