सातारा : महिलेस जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २९ रोजी एका महिलेस जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अभिषेक किशोर शिंदे आणि आदीक आनंदराव शिंदे (दोघेही रा. पाटखळ, ता. सातारा) यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले करीत आहेत.