सेवाप्रवेशोत्तर परीक्षेसाठी जिल्हा परिषदेत प्रशिक्षण सुरू; ११४ कर्मचारी सहभागी

by Team Satara Today | published on : 26 June 2026


सातारा : महाराष्ट्र जिल्हा परिषद (जिल्हा सेवा) सेवाप्रवेशोत्तर परीक्षेच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने परीक्षार्थी कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमास शुक्रवारी प्रारंभ झाला. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित या प्रशिक्षणात एकूण ११४ कर्मचारी सहभागी झाले आहेत. सेवाप्रवेशोत्तर परीक्षा ४ व ५ जुलै रोजी अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, सातारा येथे होणार आहे.

प्रशिक्षणात कार्यालयीन कामकाज, सेवा नियम, जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, शिस्त व अपील नियम, रजा, वेतन, निवृत्ती वेतन, लेखा नियम आदी विषयांवर तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. या प्रशिक्षणामुळे परीक्षार्थी कर्मचाऱ्यांना अभ्यासक्रमाची प्रभावी तयारी होऊन परीक्षेत यश मिळण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हा परिषद प्रशासनाने व्यक्त केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पीएम स्वनिधी लाभार्थ्यांसाठी ३० जूनला साताऱ्यात लोककल्याण मेळावा; सातारा नगर परिषदेचा पुढाकार
पुढील बातमी
खिंडवाडीतील खाणीत अवैध स्फोटकांचा साठा उघड; शहर पोलिसांची धडक कारवाई, राजस्थानातील एक जेरबंद

संबंधित बातम्या