काशीळ-कोपर्डे पुलाचा प्रश्न मार्गी लावणार : आ. मनोज घोरपडे

by Team Satara Today | published on : 10 July 2025


सातारा  : काशीळ - कोपर्डे पुलासाठी माझी नेहमीच आग्रही भूमिका असून काशिळ (कोपर्डे) कृष्णा- उरमोडी नदीवरील पुलासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून निधी उपलब्ध करणार आहे. याबरोबरच वेणेगाव येथे कृष्णा नदीवरील पुलासाठीही माझे प्रयत्न असून येणार्‍या एक ते दीड वर्षात काशीळ (कोपर्डे) पूल व वेणेगाव येथील पुलाचे एकाच दिवशी भूमिपूजन करणार असल्याची ग्वाही आ. मनोजदादा घोरपडे यांनी दिली. 

कोपर्डे ता. सातारा येथील जल जीवन मिशन अंतर्गत विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सातारा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन सुनील काटे, बाजार समितीचे माजी उपसभापती बाबासाहेब घोरपडे, यशवंत ढाणे, दत्तात्रय पाटील, बाजार समितीचे संचालक अ‍ॅड. धनाजी जाधव, उद्योजक सचिन देशमुख, राहुल गायकवाड, गणेश जाधव, संजय घोरपडे, आर.डी. घाडगे, अशोकराव घाडगे, जयवंतराव जाधव, विकास घोरपडे, अशोकराव कदम, सुभानराव पाटील, दादासो चव्हाण, शिवाजी जगदाळे, सुधाकर शितोळे, विकास घोरपडे, दिगंबर पाटील, अनिल माने, मानसिंग सावंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

आ. मनोज घोरपडे म्हणाले, मतदारसंघातील अंतर्गत व पाणंद रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावणार आहे. हणबरवाडी- धनगरवाडी योजना साठी दुसर्‍या टप्प्यातील 202 कोटी निधी उपलब्ध करून पाल- इंदोली उपसा सिंचनासाठी सुद्धा निधी उपलब्ध केला आहे. प्रत्येक गावातील समस्या 5 वर्षात पूर्ण करण्याचे टार्गेट आहे. विविध योजनेतून स्मशानभूमी, तांडा वस्तीसाठी निधी उपलब्ध करून पेंडन्सी प्रकार हा यापुढे दिसणार नाही.

यावेळी कोपर्डेचे माजी सरपंच संजय कदम, सरपंच कृष्णत कांबळे, उपसरपंच शहाजी निकम, आनंद कदम, तानाजीराव कदम, सुरेश कदम, प्रकाश कदम, ग्रामपंचायत सदस्य हेमंत मोहिते, राजेंद्र मोहिते, सचिन कदम, रूपाली मोहिते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शहाजी कदम यांनी सूत्रसंचलन केले. राजेंद्र मोहिते यांनी आभार मानले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रतिपूर्तीची प्रक्रिया सुलभ करणार : सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार
पुढील बातमी
गणेशोत्सव महाराष्ट्राचा उत्सव म्हणून होणार घोषित

संबंधित बातम्या