सातारा : दारू पिऊन गाडी चालवल्या प्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 7 रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास राजवाडा ते बोगदा रस्त्यावर महेंद्र साहेबराव बाबर राहणार बुधवार पेठ सातारा हे त्यांच्या ताब्यातील दुचाकी क्र. एमएच 11 डीटी 5887 मद्यार्काचे सेवन करून धोकादायकरित्या चालवीत असताना आढळून आले. अधिक तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.