सातारा तालुक्यात बेकायदा दारूविक्रीवर कारवाई; ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त; संशयितावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 18 January 2026


सातारा  : सातारा तालुक्यात अवैध दारूविक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. देगाव (ता. सातारा) येथे बेकायदा दारू विक्री करताना एका व्यक्तीस पोलिसांनी रंगेहाथ पकडले.

या प्रकरणी सुनील लक्षण माने (वय ३९, रा. देगाव, ता. सातारा) याच्याविरुद्ध सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीकडून ९२० रुपये किंमतीच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. अवैध दारूविक्रीमुळे सामाजिक समस्या वाढत असून अशा कारवायांमुळे गावागावात पोलिसांची दहशत निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महायुतीमध्ये अंतर्गत लाथाळ्या : समन्वय बैठकीचा फक्त फार्स; भाजपचा स्वबळाचा पवित्रा, राष्ट्रवादी शरद पवार गटाची चाचपणी
पुढील बातमी
अजंठा चौकात तरुणावर लाकडी दांडक्याने हल्ला; कट मारल्याच्या कारणावरून हाणामारी; दोघांवर गुन्हा

संबंधित बातम्या