बॉम्बे रेस्टॉरंट पुलाजवळ महिंद्रा शोरूमच्या पार्किंगमधून होंडा शाईन दुचाकीची चोरी

by Team Satara Today | published on : 15 May 2026


सातारा : महिंद्रा शोरूमच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने होंडा शाईन दुचाकी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. बॉम्बे रेस्टॉरंट पुलाजवळ पार्किंगमध्ये लावलेली ही दुचाकी दिवसभरात लंपास करण्यात आली.

दि. १० रोजी सकाळी साडेसात ते रात्री साडेनऊ या कालावधीत ही चोरी घडली आहे. चोरीस गेलेली दुचाकी होंडा शाईन (एम.एच ११ सीसी ८६२९) राखाडी रंगाची असून त्यावर निळे व पांढरे पट्टे आहेत. संबंधित वाहन हे १२ हजार रुपये किमतीचे असल्याची नोंद आहे.

याप्रकरणी अजित विलास सावंत (वय ४५, रा. खोकडवाडी, पो. कोडोली, ता. जि. सातारा) यांनी तक्रार दिली असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात शनिवार पेठेत शिवीगाळ व दमदाटी; गुन्हा दाखल
पुढील बातमी
रुग्णवाहिका सेवेच्या गुणवत्ता मानकांसाठी ‘बीव्हीजी’च्या सहकार्याने देशातील पहिलाच मूल्यांकनकर्ता प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी

संबंधित बातम्या