सातारा : महिलेस मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 31 रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास वनवासवाडी, ता. सातारा येथील उषा गोविंद वाघमारे यांना किरकोळ कारणावरून तेथीलच जीना अहिरेकर आणि सोन्या अहिरेकर यांनी मारहाण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.