वाहनधारकांनी विहित मुदतीत मोटार वाहन कर भरावा; फलटण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन

by Team Satara Today | published on : 11 September 2026


सातारा: रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालय, भारत सरकार यांच्या केंद्रीय मोटार वाहन नियम, २०२१ मधील अधिसूचना क्र सा.का.नि. ५९४ (अ) अन्वये बीएच (भारत) सिरीज अंतर्गत नोंदणीकृत वाहनांच्या मालकांनी आपल्या वाहनाचा मोटार वाहन कर विहित मुदतीत ऑनलाइन पद्धतीने भरावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, फलटण यांनी केले आहे.
बीएच सिरीज वाहनांसाठी नियमानुसार दर दोन वर्षांचा मोटार वाहन कर www.parivahan.gov.in या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने भरण्याची तरतूद आहे. त्यामुळे संबंधित वाहनधारकांनी आपल्या वाहनाची कर भरण्याची देय तारीख (Due Date) वाहन पोर्टलवर तपासून घ्यावी व विहित मुदतीतच कराचा भरणा करावा.
कर भरण्याच्या निर्धारित देय तारखेपासून ७ दिवसांनंतर विलंबाने कर भरल्यास दररोज ११००/- अतिरिक्त विलंब शुल्क / दंड आकारला जातो. त्यामुळे BH सिरीज वाहनधारकांनी कर भरण्यास विलंब होणार नाही याची दक्षता घेऊन वेळेत कराचा भरणा करावा व संभाव्य अतिरिक्त भुर्दंड तसेच पुढील दंडात्मक कारवाई टाळावी. तसेच कराचा भरणा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर प्राप्त होणारी कराची पावती (Tax Receipt) भविष्यातील कार्यालयीन तसेच कायदेशीर संदर्भासाठी सुरक्षित जतन करून ठेवावी, असेही उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, फलटण यांच्यामार्फत कळविण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्याचे जिल्हा उ‌द्योग केंद्राचे आवाहन
पुढील बातमी
माण, खटाव, फलटण व कोरेगाव तालुक्यांत पाणी टंचाई भासणार नाही असे नियोजन करा - पालकमंत्री शंभूराज देसाई

संबंधित बातम्या