सातारा : येथील मोळाचा ओढा येथील रिक्षास्टॉपवर रिक्षा लावण्याच्या कारणावरुन मारहाण करण्यात आली. या प्रकरणी रिक्षाचालक राजेंद्र नरसिंग परमार (वय ५४, रा. आकाशवाणी केंद्राजवळ, शाहूपुरी) यांनी फिर्याद दिली असून, समशेर जाफर पठाण (रा. मोळाचा ओढा, सातारा) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार दि. २४ रोजी घडला.
दुसऱ्या तक्रार समशेर जाफर पठाण (वय ५८, रा. मोळाचा ओढा, सातारा) यांनी दिली असून, राजेंद्र नरसिंग परमार (वय ५४), मंगेश राजेंद्र परमार (दोघेही रा. गेंडामाळ झोपडपट्टी, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.