सातारा तालुक्यातील धनवडेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार; लोक बिबट्याच्या दहशतीखाली

by Team Satara Today | published on : 14 December 2025


वेणेगाव : सातारा तालुक्यातील धनवडेवाडी येथील डोंगरात शुक्रवारी सायंकाळी बिबट्याने गायीच्या नरडीचा घोट घेतला. या हल्ल्यात गाय ठार झाली. या घटनेमुळे धनवडेवाडी, आसनगाव, पिलानी परिसरात घबराट उडाली असून लोक बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहेत.

या भागात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून शेतकरी शेतात जायला घाबरत आहेत. या भागातील पिलानी येथे पंधरा दिवसांपूर्वी बिबट्याने एका बैलावर हल्ला केला होता. त्या बैलाने बिबट्याशी झुंज दिली होती. त्या जनावरांच्या आवाजाने गावकरी गोळा झाल्याने बिबट्याने डोंगरात धूम ठोकली होती. शुक्रवारी धनवडेवाडी येथील शेतकरी गावाच्या दक्षिणेस असलेल्या डोंगरात जनावरांना चरायला घेऊन गेले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास परत येत असताना शेतकरी पुरुषोत्तम निवृत्ती पवार यांच्या गायीवर झाडीत दबा धरुन बसलेल्या बिबट्याने झडप घातली. त्याने गायीच्या नरडीचाच घोट घेतला.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पुणे-बेंगलोर महामार्गावर अपघातांचा सापळा; आ. डॉ. अतुल भोसले यांची विधानसभेत लक्षवेधी; 100 अपघातात 54 नागरिकांचा गेला जीव
पुढील बातमी
दुचाकींच्या अपघातात तीन वर्षीय मुलाचा मृत्यू; सातारा एमआयडीसी परिसरातील घटना

संबंधित बातम्या