सातारा : पानमळेवाडी, वर्ये, ता. सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील पॉलिटेक्निक सातारा कॉलेजच्या परिसरातील ट्रान्सफॉर्मर मधून कॉपर वायर अज्ञाताने चोरून नेली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गतवर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात कॉलेजच्या परिसरात असलेल्या ट्रान्सफॉर्मर मधून अज्ञाताने 45 हजार रूपये किंमतीची 225 किलो वजनाची कॉपर वायर अज्ञाताने चोरून नेली. याप्रकरणी नरेंद्र बाळकृष्ण दासदेवी (वय 59, रा. सदरबझार सातारा) यानी दिलेल्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार स्वामी करत आहोत.
कॉपर वायरची चोरी
by Team Satara Today | published on : 31 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा