पुणे : दिवाळी सणानिमित्त फुलांना मोठी मागणी असते. त्या पार्श्वभूमीवर झेंडू, तसेच मॉन्सून परतल्यानंतरही राज्यात पाऊस कायम होता. त्याचा मोठा फटका विविध प्रकारच्या फुलांना बसला आहे. त्यामुळे झेंडूची फुले मोठ्या प्रमाणात खराब झाली आहेत. चांगल्या फुलांचे प्रमाण केवळ ३० टक्के आहे.
चांगल्या प्रतीच्या फुलांना बुधवारी (दि. ३०) दुपारनंतर १०० रुपये भाव मिळाला. मात्र ग्राहक आणि हार विक्रेत्यांकडून फुलांना चांगली मागणी असल्याने काल फूल बाजारात दाखल झालेल्या बहुतांश मालाची विक्री झाली आहे. दोन दिवसांपूर्वी फुलांना मागणी नव्हती. त्यामुळे फुले गाळ्यावर शिल्लक राहिली होती. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांना दर चांगला मिळत आहे. मार्केट यार्डातील फूल बाजारात राज्यातून येणाऱ्या फुलांचे प्रमाण चांगले आहे. शेवंतीच्या फुलांची आवक पुणे आणि नगर जिल्ह्यातून होत आहे. आवक कायम राहिल्यास दरही स्थिर राहतील. विक्रीसाठी येणाऱ्या फुलांचा दर्जा चांगला आहे. मात्र मागील वर्षांच्या तुलनेत यंदा ५० ते ६० टक्क्यांनी फुलांची आवक वाढली आहे. मार्केट यार्डातून ठाणे, मुंबईसह, कोकण भागांत झेंडू विक्रीसाठी पाठविला जातो.
दिवाळीनिमित्त बाजार परिसर झेंडूच्या फुलांनी बहरला असला तरी झेंडूच्या भावाने चांगलीच उसळी घेतली आहे. मागील आठवड्यात ४० ते ५० रुपये दराने विकल्या जाणाऱ्या झेंडूचे भाव १०० रुपयांवर पोहोचला आहे. मोठमोठी आस्थापने, हॉटेल्स, दुकाने, वाहने, घर सजावटीसाठी मोठ्या प्रमाणावर झेंडू आणि इतर फुले खरेदी केली जात आहे. पुणे, सातारा, धाराशिव, हिंगोली, मोहोळ, सोलापूर, बीड, तसेच कर्नाटकातूनही फुलांची आवक झाली, तर शेवंतीची यवत, माळशिरस येथून आवक होत आहे. फुलांना शहरासह, उपनगर भागातून मागणी असते.
मागील काही दिवसांपासून सर्वत्र धुक्याचे प्रमाण वाढले आहे. आधीच पावसामुळे फुले खराब झाली आहेत आणि त्यात धुके वाढल्याने आणखी फुलांचे नुकसान होत आहे. धुके आणि दव पडत असल्याने फुले कायम ओली राहत आहेत. त्यामुळे आतील भागात ती खराब होत आहेत. धुके आणि दव आदींमुळे येत्या काळात बाजारात विक्रीसाठी आलेल्या फुलांमध्ये खराब फुलांचे प्रमाण आणखी वाढणार असल्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी राखून ठेवलेल्या फुलांना धुक्याचा मोठा फटका बसत आहे. – अरुण वीर, अध्यक्ष, अखिल फूल बाजार अडते असोसिएशन
/* Style Definitions */ table.MsoNormalTable {mso-style-name:"Table Normal"; mso-tstyle-rowband-size:0; mso-tstyle-colband-size:0; mso-style-noshow:yes; mso-style-priority:99; mso-style-parent:""; mso-padding-alt:0cm 5.4pt 0cm 5.4pt; mso-para-margin-top:0cm; mso-para-margin-right:0cm; mso-para-margin-bottom:10.0pt; mso-para-margin-left:0cm; line-height:115%; mso-pagination:widow-orphan; font-size:11.0pt; mso-bidi-font-size:10.0pt; font-family:"Calibri","sans-serif"; mso-ascii-font-family:Calibri; mso-ascii-theme-font:minor-latin; mso-hansi-font-family:Calibri; mso-hansi-theme-font:minor-latin; mso-bidi-font-family:Mangal; mso-bidi-theme-font:minor-bidi; mso-fareast-language:EN-US;}