सुमारे दीड कोटींच्या फसवणूक प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा

by Team Satara Today | published on : 11 February 2025


सातारा : वाई औद्योगिक वसाहतीतील मालाज फूड प्रॉडक्ट प्रा लि या कंपनीने फ्रान्स येथील कंपनीला पाठवलेले एक कोटी ५३ लाख ५२ हजार रुपये  आज्ञात व्यक्तीकडून परस्पर दुसऱ्या  खात्यात  वळविण्याच्या प्रकार उघडकीस आल्याने कंपनीचे व्यवस्थापक श्रीपाद सहस्त्रबुद्धे यांनी अज्ञाताविरोधात फसवणुकीची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दिल्याची माहिती परविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर यांनी दिली.

मालाज फूड प्रॉडक्ट प्रा. लि. या कंपनीने फ्रान्स येथील कंपनीला मशीन तयार करून देण्याची ऑर्डर दिली आहे. त्याप्रमाणे वेळोवेळी त्या कंपनीला त्यांनी मागणी केल्याप्रमाणे अनामत (रक्कम) रक्कम पाठवली आहे. यापूर्वी या कंपनीला काही अनामत रक्कम देण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात या कंपनीला एक कोटी ७० लाख युरो म्हणजे भारतीय बाजार मूल्य किंमत एक कोटी ५३ लाख ५२ हजार ७०० रुपये त्यांनी सांगितलेल्या खात्यावर पाठविले. त्याप्रमाणे मेलवर पत्र व्यवहार झाला होता. यानंतर जानेवारी महिन्याच्या अखेरीस फ्रान्स येथील कंपनीशी प्रत्यक्ष बोलणे झाल्यावर त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नसल्याचे त्यांनी कळविले. त्यावेळी त्यांचे खाते अज्ञात हॅकरने हॅक केले असून ही रक्कम परस्पर दुसऱ्या खात्यावर वळविली आहे, असे त्या कंपनीने कळविले. ताबडतोबिने मलाज कंपनीने त्यांच्या बँकेशी व सायबर गुन्हे शाखेची संपर्क साधून याबाबत माहिती दिली.

यानंतर फ्रान्स स्थित बँकेने ही रक्कम असलेल्या खात्यावरील व्यवहार थांबविले आहेत. या दरम्यान या अज्ञात व्यक्तीने किती रक्कम लांबविली हे कळणे आवश्यक आहे. यासाठी मालाज कंपनीने व्यवस्थापक श्रीपाद सहस्त्रबुद्धे यांनी अज्ञात व्यक्ती (हॅकर) विरोधात वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती श्याम पालेगावकर यांनी दिली. अधिक तपास वाई पोलीस आणि सायबर गुन्हे शाखा करत आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
चहाचे दुकान फोडून सुमारे साडेतेरा हजारांचे साहित्य लंपास

संबंधित बातम्या