सातारा : झारखंड (रांची) येथे सुरू असलेल्या 29 व्या सिनियर राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2026 या स्पर्धेमध्ये 100 मिटर धावणे क्रिडा प्रकारात सुदेष्णाने स्वःताची सर्वोत्कृष्ट 11.56 सेकंद अशी वेळ नोंदवून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.
सुदेष्णा 2019 ते आजअखेर पर्यंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सातारा जिल्ह्याचे व महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करत आहे. सुदेष्णाचा 2018 पासून खेळाचा प्रवास सुरू झाला आहे. सुदेष्णाने गेले आठ वर्ष तिच्या वयोगटात देशाची वेगवान धावपट्टु होण्याचा बहुमान मिळवला आहे. राष्ट्रीय पातळीवरील 64 व आंतरराष्ट्रीय पातळीवर 3 पदके मिळवत तिने आपल्या नावाचा दबदबा कायम राखला आहे .
खेलो इंडिया स्पर्धेत सलग सहा वर्ष सुवर्णपदके मिळवणारी सुदेष्णा ही देशाची एकमेव खेळाडू आहे. यास्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवून सप्टेंबर 2026 मध्ये जपान येथे होणाऱ्या आशियाई स्पर्धेत आपले स्थान पक्के केलेले आहे.
सुदेष्णाचा वेगवान धावपट्टुचा प्रवास खर्शी ता जावली या छोट्याशा खेडेगावातून सातारा ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवण्याचे खरे श्रेय तिचे गुरु बळवंत बाबर सर व तिच्या जिद्दीचे आहे.