सैदापुरात सुमारे पावणेदोन लाखांची घरफोडी

by Team Satara Today | published on : 21 June 2025


सातारा : सैदापुरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सैदापूर, ता. सातारा येथील घरात अज्ञातांनी घरफोडी करत 1 लाख 81 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. ही घटना दि. 19 रोजी घडली. सातारा तालुका पोलीस ठाण्यात निशा सुनील आवळे (वय 30, रा. आदित्यनगर, सैदापूर, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक ए. एस. मोरडे तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून
पुढील बातमी
अल्पवयीन मुलीचे अपहरण

संबंधित बातम्या