सातारा : खा. श्री. छ. उदयनराजे यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ पवार यांनी मिरा भाईंदर येथील नित्यानंद आश्रमामध्ये अन्नदान तसेच केक कापून उदयनराजे यांना अभिनव पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अखंड हिदूस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचा 24 फेब्रुवारी हा वाढदिवस म्हणजे त्यांच्या हितचिंतकांसाठी एक पर्वणीच असते. उदयनराजे यांचा रोखठोकपणा, त्यांची हटके स्टाईल आणि तरीही जनमानसांत मिसळून वावरणारा राजघराण्यातील व्यक्ती, यामुळे ते नेहमीच जनमानसांच्या गळ्यातील ताईत बनून राहिले आहेत. त्यामुळेच सातार्यासह संपूर्ण भारत देशात त्यांचा चाहता वर्ग आहे.
त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ बळवंत पवार हे खा. श्री. छ. उदयनराजे यांना आपला आयकॉन मानतात. त्यामुळे सातार्यात आले की ते नेहमीच उदयनराजेंना भेटल्याशिवाय जात नाहीत. त्यातच 24 फेब्रुवारी हा दिवस म्हणजे उदयनराजेंचा वाढदिवस. याच दिनाचे औचित्य साधून पवार यांनी उदयनराजे यांना हटके शुभेच्छा दिल्या. मिरा भाईंदर येथील बेघर, असहाय्य असणार्या लोकांसाठी असणार्या नित्यानंद आश्रमामध्ये पवार यांनी आश्रमातील लोकांना भोजनाची व्यवस्था करुन आश्रमास 200 किलो अन्नधान्य दिले. त्याचबरोबर उदयनराजे यांच्या अनुपस्थितीतही केक कापण्यात आला. सोमनाथ पवार यांच्या या खा. श्री. छ. उदयनराजे यांना दिलेल्या अभिनव शुभेच्छांचे आश्रमातील लोकांसह अधिकारी-कर्मचार्यांनी तोंड भरुन कौतुक केले.
यावेळी संस्थेचे सदस्य संदीप पवार, संदीप टिपरे, कुमार बेडके, गणेश बेडके, दीपक तोडकरी, भीमराव तायडे आदी उपस्थित होते.