सातारा : स्वाभिमानी शेतकरी संघटना, सातारा जिल्ह्याच्यावतीने येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
ही बैठक आज शनिवार, दि. ३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली असून, सातारा जिल्ह्यातील सर्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार, गट-गण रचना, स्थानिक परिस्थिती तसेच पुढील रणनीती निश्चित करण्याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. तसेच शेतकरी हितासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत काम करण्याची इच्छा असलेल्या सर्व पक्ष, संघटना, शेतकरी, महिला व तरुणांना देखील या बैठकीस उपस्थित राहण्याचे खुले आमंत्रण देण्यात आले आहे.ही बैठक सर्वांसाठी खुली असून, आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
ही माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटना, सातारा जिल्हा यांच्या वतीने देण्यात आली असून,जिल्हाध्यक्ष राजू शेळके, राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुनभाऊ साळुंखे, राज्य प्रवक्ते अनिल पवार,जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, पक्षाध्यक्ष देवानंद पाटील,युवा आघाडी जिल्हाध्यक्ष तानाजीराव देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब यादव, वाहतूक संघटना अध्यक्ष मनोहर येवले यांनी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.