छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे एम.ए. मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

डिजिटल मीडिया क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी..!

by Team Satara Today | published on : 05 June 2025


सातारा : नव्या युगातील डिजिटल माध्यमांच्या विस्तारासोबतच मीडिया शिक्षण क्षेत्रातही नवे मार्ग खुले झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा (कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय) येथे एम.ए. मास कम्युनिकेशन या दोन वर्षांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी पात्र आहेत. अभ्यासक्रमाची रचना उद्योगजगतातील सध्याच्या गरजांनुसार करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना डिजिटल युगात आवश्यक असलेल्या कौशल्यांचे प्रशिक्षण मिळणार आहे.

अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये

या अभ्यासक्रमात प्रॅक्टिकल व कौशल्याधिष्ठित शिक्षण, मल्टीप्लॅटफॉर्म कंटेंट क्रिएशन, इंडस्ट्री-रिलेटेड टूल्स व टेक्निक्स, थिअरी आणि रिसर्च यांचा समन्वय तसेच इंडस्ट्री एक्सपोजर प्रोजेक्ट्स यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना व्हिडिओ प्रोडक्शन, एडिटिंग, पॉडकास्टिंग, सोशल मीडिया मॅनेजमेंट आदी बाबींचं सखोल मार्गदर्शन मिळेल.

करिअर संधी

या अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांना कंटेंट क्रिएटर, पॉडकास्ट प्रोड्यूसर, सोशल मीडिया मॅनेजर, डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, स्क्रिप्ट रायटर, डायरेक्टर, एडिटर, डॉक्युमेंटरी किंवा शॉर्ट फिल्म मेकर, तसेच यूट्युबर/इन्फ्लुएंसर अशा विविध करिअर संधी खुल्या होणार आहेत.

या संदर्भात माहिती देताना मीडिया अँड एंटरटेनमेंट विभागाचे प्रमुख डॉ. संपत पिंपळे यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांना केवळ नोकरीसाठी नव्हे, तर स्वतःचं डिजिटल ब्रँड उभारण्यासाठीही मार्गदर्शन आणि संधी देण्याचा आमचा उद्देश आहे.”

याप्रसंगी प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी सांगितले की, “आजच्या डिजिटल युगात युवकांसमोर करिअरच्या अनंत संधी उपलब्ध आहेत - मात्र योग्य दिशा, प्रशिक्षण आणि व्यासपीठ मिळणं हेच सर्वात मोठं आव्हान आहे. उद्योगजगतात यशस्वी होण्यासाठी ‘कौशल्य, आत्मविश्वास आणि सर्जनशीलता’ आवश्यक असते. हीच संधी आता छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा तुमच्यासमोर घेऊन येत आहे - एम.ए. मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून.”

अधिक माहितीसाठी व प्रवेश प्रक्रियेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी 9823497799 किंवा 8830147235 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कोर्स चे समन्वयक प्रो. डॉ. अनिलकुमार वावरे यानी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दुचाकीवरुन पडल्याने महिलेचा मृत्यू
पुढील बातमी
कुशल महाराष्ट्र – रोजगार युक्त महाराष्ट्र हे ध्येय समोर ठेवून जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजका विभागाचे काम

संबंधित बातम्या