सातारा : मोती चौक परिसरातील कर्मवीर पथावरभरधाव वेगाने आलेली कार लगतच्या हॉटेलवर अनियंत्रित होऊन आदळल्याने अपघात झाला या अपघातामध्ये एक जण जखमी झाला आहे. या जखमीचे नाव मात्र समजू शकले नाही शाहूपुरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन अपघात ग्रस्तकार तेथून हटवली.
कार टाटा कंपनीची असून याबाबत अधिक माहिती घेण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. शुक्रवारी रात्री सव्वा बाराच्या दरम्यान टाटा अल्ट्रोज कंपनीची कार मोदी चौकाकडून पोवई नात्याच्या दिशेने जात असताना अचानक नियंत्रित झाली आणि लगतच्या मिलन नावाच्या हॉटेलवर आढळली. यामध्ये संबंधित हॉटेलच्या दरवाजाचे मोडतोड होऊन जोरदार नुकसान झाले. याबाबत रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते.