सातारा : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. एक छोटीशी मदत म्हणून शरावती विजयकुमार सुकटनकर यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 हजाराचा धनादेश पालकमंत्री कार्यालयात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सुपुर्द केला.
या प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी आदी उपस्थित होते.
मराठवाड्यासह इतर विभागात अतिवृष्टीमुळे शेती व शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासन शेतकऱ्यांना सर्वती मदत करण्यास कटीबद्ध असून नागरिकांनी आपआपल्यापरीने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करावी, असे आवाहनही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केले.